असेच काही मुद्दे मांडले आहेत तर जरूर बघा.🍁
● तुमच्या आवडींचा आदर करा...
हा पहिला मुद्दा म्हणजे आवडींचा आदर...! तुमचे छंद लपवणे थांबवा. उघडपणे शेअर करा कारण प्रत्येका मध्ये काहीतरी कला असतेच, अस नाही की माझ्यामध्ये काय आहे यार, मी तर असाच आहे, वैगेरे वैगेरे...!
असे बरेच लोक आहेत ज्यांना तुमच्या वास्तविकतेमध्ये रस असू शकते,
तुम्ही जो पर्यंत स्वतः ला वेळ देत नाही, तोपर्यंत कस कळणार..?
असं काही नाही की, तुम्ही लिहावे, चित्र काढायला हवेत प्रत्येकाची आवडं वेगवेगळी असते, फक्त गरज आहे तर तो दृष्टिकोनाचा. आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहोत, कोणी विद्यार्थी तर कोणी नोकरीच्या क्षेत्रात तर काहींचा वेगळा पणं असू शकते. दररोजच्या जीवनासोबत आपला छंद पण बाळगला तर किती बरं...!
● तुमच्या शब्दाचा आदर करा...
सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे तुमचा शब्द. त्यामुळे प्रामाणिक राहा, मते तयार करा, तुम्हाला खरोखर कसे वाटते ते उघडपणे संवाद साधा. "बोलण्याने मन हलक होत..!" हे ऐकलं ना...?
आपल्या शब्दांच योग्य रीतीने उपयोग करा. कारण शब्द ही अशी एकमेव गोष्ट आहे, ज्यांच्यामुळे माणूस जवळ पण येते आणि दूर पणं जाऊ शकतो.
आपण जो पर्यंत आपल्या शब्दांना मान नाही देतं तो पर्यंत दुसरं कस काय देणारं सांगा बरं...!
● प्रथम तुमच्या गरजांचा आदर करा...
तुम्हाला कशामुळे आनंद मिळेल ते शोधा, आणि तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेण्यापूर्वी दुसऱ्याच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका.
तुमच्या कुटुंबाला, स्वतःला जास्त प्राधान्य दिले पाहिजे.
तर द्याल ना...?
● तुमच्या विचारांचा आदर करा...
तुमचे विचार येऊ द्या, ते स्वीकारा आणि मग शांतता किंवा ध्यानाद्वारे सकारात्मक विचार करायची सवय बाळगा.
आपले विचार, बोलण्याची पद्धत आणि वागणूक यामधून आपली वर्तणूक कशी आहे हे समजण्यासाठी मदत होते, तसेच आपले प्रतिबिंब या गोष्टी मधून झळकते.
● तुमच्या अपयशांचा आदर करा...
प्रत्येक नकारात्मक गोष्टी कडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, त्यांना तुमच्या फायद्यासाठी वळवा.
"अपयश" हे येते जाते ते काही कायम स्वरूपात राहत नसते, आपल्या मधील कमतरतेची जाणीव करण्याकरिता ते येत असते. हे जितक्या लवकर कळतं ते बरं...! मुख्य म्हणजे दुसऱ्यांना दोष देणे आधी बंद केलं पाहिजे, असा कोणताच माणूस/स्त्री वाईट नसते.
इथ विषय आहे तर तो फक्त दृष्टिकोनाचा ...!
● तुमच्या वेळेचा आदर करा...
तुमचा वेळ कार्यक्षमतेने व्यवस्थापित करा. खरोखर काय महत्वाचे आहे, ते स्वतःला विचारा आणि आपले प्राधान्य संतुलित करा. कांहीं प्रश्न स्वतः ला विचारा..!
आपण दररोज काय करतो..? आपला वेळ योग्य ठिकाणी खर्च होतो का..?
आपण स्वतःसाठी किती वेळ खर्च करतो..?
अशा विषय वरती मला छान वाक्य आठवलं...,
"ही वेळही निघून जाईल".
बाकी काही नाही फक्त एव्हढंच की वेळेचा आदर केला, तर वेळ आपला आदर करेल.
● तुमच्या भावनांचा आदर करा...
अशा कामात राहू नका ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो. तो भाग वेगळा जिथं जबादारीचा विषय येतो तिथं सर्व गोष्टी अपूर्ण पडतात....
तसेच ,अशा नात्यात राहू नका. ज्यामुळे तुम्हाला दुःख होईल, काही योग्य वाटत नसेल तर करू नका, कारण नंतर पश्चाताप केल्यापेक्षा, आधी योग्य वाटेवर चाललेलं केव्हापणं बरं...!
मी या विषया वर अधिक जास्त काही लिहीत नाही, नाहीतर मीच स्वतः या विषयात भटकून जाईल.
आणि हां सांगायचं झालं तर मुख्य म्हणजे स्वतः ला वेळ देणे शिका...!🕰️✌🏼
हा असा विषय आहे की याबद्दल किती पण लिहिलं ते कमी पडेल....माझ्या या छोट्याश्या लिखाण द्वारे सांगायचा एक लहानसा मुद्दा.
तर कुठं काहीं मागे - पुढं झालं असेल तर समजून घ्याल अशी मी आशा बाळगतो...!
आणि पटलं असेल.. तर प्रतिक्रिया अवश्य द्याल...
धन्यवाद...!🙏🏻
🖤😇